|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण बसस्थानकाचे काम सुरू

मालवण बसस्थानकाचे काम सुरू 

3 कोटी 12 लाखाचा निधी मंजूर

प्रतिनिधी / मालवण:

मालवण बसस्थानकच्या नव्या इमारत बांधकामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुसज्ज बसस्थानक उभारणीसाठी केलेल्या पाठपुराव्यातून बसस्थानकासाठी तीन कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. विशेष म्हणजे आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून या बसस्थानकात सिनेमागृहाचीही निर्मिती होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बसस्थानकाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, नगरपालिका हद्दीतील इमारत बांधकाम परवानगी पालिका प्रशासन स्तरावर चार महिने रखडली होती. याप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक व पालिका अधिकाऱयांना याचा जाब विचारला होता. त्यानंतर बांधकामाला परवानगी मिळाली.

इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक प्रवासी जखमी झाला. त्यामुळे इमारतीचे काम तात्काळ सुरू करा, अशा सूचना नाईक यांनी आगार व्यवस्थापकांना दिल्या. आठ दिवसात काम सुरू न झाल्यास विभाग नियंत्रकांना मालवणात आणून काम सुरू करून घ्यावे लागेल, असा इशारा दिल्यावर एसटी प्रशासन व संबंधित ठेकेदाराने तात्काळ कामास सुरवात केली आहे.

जुन्या इमारतीमागे नवी इमारत

मालवण बसस्थानक येथे असलेल्या जुन्या इमारतीमागे नवी इमारत उभारणी होणार आहे. त्या ठिकाणी कामाला सुरुवात करून शेड उभारणी होणार आहे. त्यामुळे इमारत बांधणी होईपर्यंत डेपोत येणाऱया गाडय़ा वळविण्यासाठी प्रवासी वर्गाच्या बैठक व्यवस्थेसाठी असलेली पत्र्याची शेड हटविण्यात आली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

जेनेरिक मेडिसीन स्टोअर, सिनेमागृह

नव्या बसस्थानक इमारतीच्या तळमजल्याला सहा प्लॅटफॉर्म, पॅसेंजर हॉल, पुरुष व महिला स्वच्छतागृह, कॅटिंग, वेटिंग हॉल, दुकान गाळे, लेडीज रेस्ट रुम, हिरकणी कक्ष, जेनेरिक मेडिसिन स्टोअर व सर्व अद्ययावत सोयी सुविधा असणार आहेत. पहिल्या एसटी कार्यालय, तर वरच्या मजल्यावर अद्ययावत असे 60 सीटचे सिनेमागृह होणार आहे.

Related posts: