|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपमधून बाहेर तरीही टीम इंडिया करोडपती

वर्ल्डकपमधून बाहेर तरीही टीम इंडिया करोडपती 

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. सेमीफायनलमधील पराभवानंतरही टीम इंडिया करोडपती बनली आहे. 14 जुलै रोजी होणाऱया लॉर्ड्सवरील अंतिम लढतीनंतर टीम इंडियाला 7.55 कोटी व ट्रॉफी आयसीसीकडून मिळणार आहे.

 विशेष म्हणजे, यंदा प्रथमच आयसीसीने बक्षीसाची रक्कम वाढवली असून यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या संघाला देखील बक्षीस दिले जाणार आहे. यानुसार वर्ल्डकप विजेत्या संघाला तब्बल 28 कोटी रुपये व ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला 14 कोटी, ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच उपांत्य फेरीत दाखल झालेल्या दोन्ही संघांना 5.5 कोटी देण्यात येणार आहे.

 याबरोबर आयसीसी प्रत्येक संघाला साखळी सामन्यातील विजयासाठी 27 लाख रुपये देणार आहे. यामुळे आयसीसीच्या बक्षीस रकमेनुसार भारताला उपांत्य सामन्यातील पराभूत संघ म्हणून 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी 27 लाख तर पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यासाठी 13 लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे साखळी फेरीतील विजय मिळवलेल्या बक्षीसाची रक्कम 2.5 कोटी रुपये होत असून भारतीय संघाला तब्बल 7.5 कोटी रुपये मिळतील. यामुळे जरी टीम इंडिया उपांत्य फेरीतून बाहेर झाली असली तरी करोडतपती होणार आहे, हे मात्र निश्चित आहे.

 

Related posts: