|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला फुटबॉल संघ 57 व्या स्थानी

भारतीय महिला फुटबॉल संघ 57 व्या स्थानी 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

फिफाच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय महिला फुटबॉल संघाने 57 वे स्थान मिळविले आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मानांकनात सहा अंकांनी सुधारणा झाली.

 गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत भारतीय महिला फुटबॉल संघाची कामगिरी चांगली झाली. त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आल्याने फिफाच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय महिला फुटबॉल संघाचे स्थान 6 अंकांनी वधारले. यापूर्वी या यादीत भारतीय महिला फुटबॉल संघ 63 व्या स्थानावर होता. आशियाई देशांच्या मानांकन यादीत भारतीय महिला फुटबॉल संघाने 11 वे स्थान मिळविले. भारतीय महिला फुटबॉल संघाने 1422 गुण मिळविले आहेत. 29 मार्च रोजी घोषित करण्यात आलेल्या आशिया खंडातील देशांच्या मानांकनात भारताने 1392 गुण मिळविले होते. गेल्या जानेवारीपासून भारतीय महिला फुटबॉल संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर 18 सामने खेळले असून त्यापैकी 12 सामने जिंकले तर पाच सामने गमविले आणि एक सामना बरोबरीत राखला. चालू महिन्याच्याअखेरीस स्पेनमध्ये होणाऱया कॉटिफ चषक महिलाच्या फुटबॉल स्पर्धेत भारत सहभागी होणार आहे.

Related posts: