|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » अमेरिका क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी किरण मोरे

अमेरिका क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी किरण मोरे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिका क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज किरण मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अमेरिकन क्रिकेटचे संचालक म्हणून मोरेची नेमणूक करण्यात आली होती.

अमेरिका क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक लंकेचे पी.दासनायके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अमेरिकन संघाला आता किरण मोरे, भारताचे माजी कसोटीवीर सुनील जोशी आणि प्रवीण आमरे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी संयुक्तपणे सोपविण्याचा निर्णय अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतला आहे. गेल्या जूनमध्ये अमेरिका क्रिकेटच्या संचालकपदी 56 वर्षीय किरण मोरेची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विंडीजचा फलंदाज किरेन पॉवेल यांच्याकडे विदेशी दौऱयात संघ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच अमेरिका क्रिकेट संघाच्या पूर्ण वेळेसाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आली. लंकेच्या दासनायके यांच्याकडे तीन वर्षे प्रशिक्षकपदची जबाबदारी होती पण अमेरिकन क्रिकेट मंडळ व दासनायके यांच्यातील संबंध बिघडल्याने दासनायके यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आता किरण मोरेकडे हंगामी स्वरूपात ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतला आहे.