|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाशी ग्रिझमन करारबद्ध

बार्सिलोनाशी ग्रिझमन करारबद्ध 

वृत्तसंस्था/ माद्रीद

स्पॅनीश फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या बार्सिलोना संघाने ऍटलेटिको माद्रीद संघातून यापूर्वी खेळणाऱया फ्रान्सच्या 28 वर्षीय ग्रिझमनशी करार केल्याची घोषणा केली आहे. या करारापोटी बार्सिलोना संघाने सुमारे 120 दशलक्ष युरोस (135 दशलक्ष डॉलर्स) रक्कम मोजली आहे.

 गेल्यावर्षी बार्सिलोना क्लबने ग्रिझमनबरोबर करार करण्याचे ठरविले होते. पण बार्सिलोनाची ही ऑफर ग्रिझमनने नाकारली होती. आपण ऍटलेटिको माद्रीद क्लब सोडणार असल्याची घोषणा ग्रिझमनने गेल्या मे महिन्यात केली होती. 2014 पासून ग्रिझमन ऍटलेटिको माद्रीद संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.

Related posts: