|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » उदयवीर सिद्धूला दोन सुवर्ण

उदयवीर सिद्धूला दोन सुवर्ण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुहल, जर्मनी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या कम्बाईन्ड विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूने दोन सुवर्णपदके पटकावल्याने भारताला पदकतक्त्यात पहिले स्थान मिळाले. रायफल, पिस्तुल व शॉटगन अशा तीन प्रकारांत स्पर्धा घेण्यात येत आहे.

कनिष्ठ पुरुषांच्या 25 मी. स्टँडर्ड पिस्तुल नेमबाजीत 575 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. भारतीय नेमबाजांनी या प्रकारात क्लीन स्वीप साधले असून आदर्श सिंगने (568) रौप्य व अनिश भनवालाने (566) कांस्यपदक पटकावले. उदयवीरने नंतर जुळा भाऊ विजयवीर सिद्धू आणि आदर्श यांच्यासमवेत सांघिक सुवर्णपदक पटकावताना एकूण 1707 गुण नोंदवला. कनिष्ठ गटातील हा नवा विश्वविक्रम आहे. या प्रकारातील रौप्यपदकही भारतानेच पटकावले. अनिश, राजकंवर संधू व दिलशान केली यांनी एकूण 1676 गुण घेत दुसरे स्थान मिळविले.

भारताने एकूण पाच पदके मिळविली असून त्यात 2 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यपदकाचा समावेश आहे. चीन व थायलंड यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले असून त्यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पटकावले आहे.

Related posts: