|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड की न्यूझीलंड? फैसला आज

इंग्लंड की न्यूझीलंड? फैसला आज 

 

विवेक कुलकर्णी/ लंडन

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील नवा विश्वविजेता कोण असेल, हे आज (रविवार दि. 14) ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर स्पष्ट होईल. यंदा चौथ्यांदा आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल होणारे इंग्लंड व सलग दुसऱयांदा जोरदार धडक मारणाऱया न्यूझीलंड संघात येथे जेतेपदासाठी झुंज रंगणार आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता या निर्णायक लढतीला प्रारंभ होणार आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंत ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर या लढतीची जोरदार तयारी केली गेली. दोन्ही संघांनी या महत्त्वपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर कसून सराव केला. शिवाय, विजयाचा आत्मविश्वासही व्यक्त केला. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील एकाही संघाला आजवर एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही. त्यामुळे, आज सायंकाळी लॉर्डसच्या ऐतिहासिक गॅलरीत विश्वचषक उंचावणारा संघ इंग्लंडचा असेल की न्यूझीलंडचा, याची विशेष उत्सुकता असेल.

Related posts: