|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हेल्मेट न वापरणाऱया 100 पोलिसांवर कारवाई

हेल्मेट न वापरणाऱया 100 पोलिसांवर कारवाई 

@ सोलापूर / प्रतिनिधी

शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱयांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करावा अशा सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्यानंतर  झालेल्या कारवाईत साधारण 100 पोलिसांना कारवाईचा फटका बसला आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना त्याची सुरुवात स्वत: पासून व्हावी या हेतूने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांच्या डोक्यावर हेल्मेट दिसून येत आहेत. दरम्यान सोमवारपासून शासकीय कार्यालयात येणारे अधिकारी व कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त शिंदे यांनी शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार घेतला. त्यांनी शहर पोलीस दलाची ढेपाळलेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याची सुरुवात दुचाकी चालविणारे पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱयांसह नाग†िरकांनीही हेल्मेट वापरावे अशा सूचना पोलिसांच्या सर्व विभागांना दिल्या आहेत. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकी वापरणाऱया पोलिसांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर 10 ते 13 जुलै दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये 100 पोलिसांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवार 15 जुलै पासून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालये, महानगरपालिका, तहसिलदार कार्यालये आदी शासकीय कार्यालय परिसरात कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे अधिकारी तसेच कर्मचाऱयांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. शिवाय कामानिमित्त येणाऱया नागरिकांवरही कारवाई होणार आहे. याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहे. त्यानंतर मुख्य बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱया दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. यापुढे विनाहेल्मेट कारवाईत सातत्य राहणार आहे. तसेच सिटबेल्ट न वापरणाऱया विरुध्दही कारवाई होणार आहे.

Related posts: