|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पावसाची उघडीप, धरण क्षेत्रातही जोर कमी

पावसाची उघडीप, धरण क्षेत्रातही जोर कमी 

प्रतिनिधी/ सांगली

धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचो जोर कमी झाली. याशिवाय जिल्हयातीलही पावसाने उघडीप दिली. दरम्य़ान वारणेत 18.9 तर कोयनेत 43.3 मिमी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान

गेल्या काही दिवसाप्पासून चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवॉधार सुरू होती ती शनिवारी काही कमी झाली. शनिवारी दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात 39 तर वारणा धरण क्षेत्रात फक्त 13 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कमी झाली तरी धरणातील पाण्याच्या साठयात वाढ सुरूच असून जता चांदोली धरणात 18.9 टीएमसी पाणीसाठा होता. कोयना धरण 43.3 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

शनिवारी जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली.  शिराळा तालुक्यात सर्वाधिक 5  मिरज 2, खानापूर-विटा 2, वाळवा 2, तासगाव 1, पलूस 3, कडेगाव 2 मिमी पाऊस पडला तर दुष्काळा खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात काहीही पाऊस पडला नाही. पावसाने उघडीप दिल्याने नदी पातळीमध्येही घट होत असून कृष्णा आर्युविनची पातळी 13 फुटापर्यंत खाली गेली आहे.

Related posts: