|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज’

‘पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज’ 

प्रतिनिधी/ विटा

पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शहरात नागरिकांसोबत पालिकेच्या मदतीने हजारे मळा परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची नैतिक जबबदारी पार पाडली आहे. नागरिकांनी परिसरात प्राणवायू देणारी झाडे आणि फळ झाडे, फुल झाडे लावून हजारे मळा परिसर पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले.

येथील नगरपालिकेच्यावतीने शहरात 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या अंतर्गत 40 हजार 500 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने हजारे मळा परिसरात वृक्ष रोपांचे वितरण करण्यात आले. नगरसेवक किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

यावेळी आरोग्य निरिक्षक आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे, सलीम शेख, अस्लम शेख, हेमल भाजीभाकरे, प्रमोद भोसले, प्रियांका खेडकर, रोहित पवार, प्रतीक्षा कदम, श्रीकांत विभुते, दिव्यांनी हराळे, श्रद्धा तुपे, सोनाली निकम, वैष्णवी बाबर, शैलेश आयवळे, सूरज मंडले, राधिका व्हावळ, नितीन टकले, नदीम मुल्ला, तेजस भिसे, सचिन महापुरे, आकाश जाधव, जयश्री काळे, शिल्पा गुजर, संजय कांबळे, रोहन भंडारे, संजय चिमणे, पुनम महाजन, भारत कारवर, मालन सवते, सिधू माने यांच्यासह हजारे मळा परिसरातील नागरिक, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Related posts: