|Friday, November 15, 2019
You are here: Home » leadingnews » ‘चांद्रयान-2’ अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज

‘चांद्रयान-2’ अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज 

ऑनलाईन टीम / श्रीहरिकोटा :

जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-2’ च्या उड्डाणाला आता काही तास उरले आहेत. या मोहिमेची सर्व तयारी झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून जीएसएलव्ही मार्क-3 च्या मदतीने उद्या (दि.15) पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी हे चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार आहे.

इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. उद्या पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 ला भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क-3च्या मदतीने लॉन्च केले जाणार आहे. लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. या दरम्यान चांद्रयानाचा वेग अधिकाधिक 10 किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी 3 किलोमीटर असेल. लाँचिंगनंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहचेल.

चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे. चांद्रयान-2 चे वजन 3.8 टन म्हणजेच आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे. चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही. यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

Related posts: