|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » विमानतळावर शर्यतीदरम्यान दोन बस एकमेकांना धडकल्या

विमानतळावर शर्यतीदरम्यान दोन बस एकमेकांना धडकल्या 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शर्यतीदरम्यान एअरलाइन्सच्या दोन बसमध्ये धडक झाली. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांचा विरोध जुगारुन चालकांनी ही शर्यत लावली होती.

उदयपूर आणि अन्य शहरातून आलेल्या विमानातील प्रवाशांना या बस टर्मिनल 2 पर्यंत घेऊन जात होत्या. त्यावेळी या दोन बसच्या चालकांनी आपापसात शर्यत लावली. प्रवाशांनी या शर्यतीला विरोध केला. मात्र, बस चालकांनीं प्रवाशांचे ऐकले नाही. अखेर शर्यतीदरम्यान दोन्ही बस एकमेकांना धडकल्या. या दुर्घटनेत दोन्ही बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस तपास करत आहेत.

 

 

Related posts: