|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » ऑन डय़ुटी पोलीस हवालदाराची हत्या

ऑन डय़ुटी पोलीस हवालदाराची हत्या 

ऑनलाईन टीम / उदयपूर :

राजस्थानमधील राजसमंदमध्ये डय़ुटीवर असलेल्या पोलीस हवालदाराचा अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ऑन डय़ुटी पोलिसाचीच भरदिवसा हत्या झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अब्दुल गनी (वय 45) असे हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गनी हे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी काल संध्याकाळी संबंधित घटनास्थळावर गेले होते. तिथे काही जणांनी अचानक गनी यांच्यावर लोखंडी सळई आणि लाठय़काठय़ांनी हल्ला चढवला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. या हल्ल्यात गनी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

Related posts: