|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » हिमा दासने पटकविले अकरा दिवसात तिसरे सुवर्णपदक

हिमा दासने पटकविले अकरा दिवसात तिसरे सुवर्णपदक 

ऑनलाईन टीम / झेक प्रजासत्ताक :

वेगवान धावपटू हिमा दास हिने 11 दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. क्लांदो स्मृती ऍथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.

आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमाने गतवषी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्मयपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पDिान आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत 11 दिवसांत भारताला तीन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमाने 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.

Related posts: