|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » नवज्योतसिंग सिद्धूंकडून मंत्रिपदाचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धूंकडून मंत्रिपदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / चंदीगढ :

काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. ट्विटरवरुन सिद्धू यांनी ही माहिती दिली.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी महिनाभरापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, त्याचा खुलासा सिद्धू यांनी आज केला. सिद्धू यांनी राहुल गांधी यांच्याकडे 10 जुलैलाच आपला राजीनामा पाठविला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे खापर अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर फोडले. त्यानंतर दोघांमधील मतभेद वाढीस लागले. लोकसभा निवडणुकीनंतर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली. सिद्धू यांच्याकडे असणारे नागरी प्रशासन काढून त्यांना उर्जा खाते देण्यात आला. मतभेदानंतर सिद्धू यांनी या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Related posts: