|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री आघाडीचाच होणार : बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्री आघाडीचाच होणार : बाळासाहेब थोरात 

ऑनलाईन टीम / नगर :

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील रिक्त जागांवर नवोदीत तरुणांना संधी देण्यात येईल. राज्यात काँगेस पुन्हा नव्या जोमाने उभे राहील आणि पुढील मुख्यमंत्री महाआघाडीचाच असेल, असा दावा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केला.

बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर काही लोक पक्ष सोडून दुसऱया पक्षात गेले. त्याचा आगामी काळात काँग्रेसवर फारसा परिणाम होणार नाही. नवोदीत तरुणांना रिक्त जागांवर संधी देण्यात येईल. काँग्रेस सोडून गेलेल्यांची चिंत्ता करण्याचे काहीच कारण नाही. यापुढील काळात नवे आणि जुने असे सर्व जण एक दिलाने काम करून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.