|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यातील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले

ठाण्यातील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले 

ऑनलाईन टीम / ठाणे :

ठाण्याच्या कोपरी येथील मिठागर परिसरात बेपत्ता असलेल्या दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शुभम विनोद देवकर (वय 15) आणि प्रवीण सत्यम कंचारी (15) अशी या दोन मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शुभम आणि प्रवीण हे दोघेहीजण कोपरीच्या सुभाष नगरमध्ये राहतात. हे दोघेही बेपत्ता होते. काल त्याबाबतची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. आज दुपारी कोपरी येथील के. सी. इंजिनीयरिंग कॉलेजवळील मिठागर परिसरात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. कोपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Related posts: