|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » न्यूयॉर्कमध्ये ‘ब्लॅकआउट’

न्यूयॉर्कमध्ये ‘ब्लॅकआउट’ 

वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क 

अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये शनिवारी अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने पूर्ण शहर काळोखात बुडाले आहे. वीजसेवा बंद पडल्याने 50 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मिडटाउन मॅनहॅटन आणि अप्पर वेस्ट साइडमधील नागरी वस्तीला फटका बसला आहे.

शनिवारी रात्री 8.30 वाजता (स्थानिक प्रमाणवेळ) अचानकपणे वीजपुरवठा ठप्प झाल्याने शहराच्या 40 व्या स्ट्रीटपासून 72 व्या स्ट्रीटपर्यंत तसेच फिफ्थ ऍव्हेन्यूपासून हडसन नदीपर्यंतचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.

वीजपुरवठा बंद झाल्याने प्रसिद्ध टाईम्स स्क्वेयरच्या बिलबोर्ड्सवरही काळोख दाटला आहे. प्रसिद्ध हेल्स किचनची सर्व रेस्टॉरंट्स काळोखात बुडाली असून शहराच्या सबवे यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. वीजपुरवठा नसल्याने 4 रेल्वेस्थानके बंद ठेवावी लागली आहेत.

Related posts: