|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » कॅलीस, कॅटीच यांना केकेआरकडून डच्चू

कॅलीस, कॅटीच यांना केकेआरकडून डच्चू 

वृत्तसंस्था/ कोलकाता

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 2019 च्या हंगामात असमाधानकारक कामगिरी झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपले प्रमुख प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे जॅक्वीस कॅलीस आणि साहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटीच यांची हकालपट्टी करण्याचे निश्चित केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली तर 2019 च्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2011 साली कॅलीसची या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. कॅलीस आणि कॅटीच यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेत 61 पैकी 32 सामने जिंकले.

 

Related posts: