|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून 7 ठार, 23 जखमी

हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून 7 ठार, 23 जखमी 

ऑनलाईन टीम / शिमला :

हिमाचल प्रदेशातील सोलन येथे चार मजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. तर काही जण ढिगाऱयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, दुर्घटनेतील 7 मृतांपैकी 6 जण भारतीय जवान आहेत. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीमचे रेस्क्मयू ऑपरेशन सुरु आहे.

या इमारतीत 37 जण वास्तव्याला होते. त्यापैकी 30 जण भारतीय जवान होते. ढिगाऱयाखाली 12 जण अडकले आहेत. जखमींमध्ये 18 जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांकडूनही घटनास्थळी शोधमोहिम सुरु आहे. या दुर्घटनेत 37 लोक अडकले आहेत. आतापर्यंत 23 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अनेक जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related posts: