|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; खासदारांची मागणी

आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; खासदारांची मागणी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आसाममध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 21 जिह्यांतील 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. 1556 गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, अशी मागणी आसामच्या खासदारांनी केली आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 21 जिह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे. राज्यातील पुराचा सर्वाधिक फटका बारपेट जिह्याला बसला आहे. या जिह्यातील 3.5 लाख लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी 68 मदत छावण्या उभारल्या आहेत.

Related posts: