|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलकडून ‘शूलेस’

फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलकडून ‘शूलेस’ 

सोशल नेटवर्किंगमध्ये पकड मजबूतीसाठी प्रयत्न

नवी दिल्ली

सध्या सोशल मीडिया लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असून, लोकांचे जीवनही पूर्णतः बदलून गेले आहे. यात आता पुन्हा शिरकाव करत फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने आपले नवीन सोशल मीडिया ऍप शूलेस सादर केले आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ते एकमेकांना ऑफलाइन कनेक्ट होऊ शकणार आहेत. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गुगलच्या इन-हाउस टीम एरिया 120 युनिटद्वारे डिझाइन करण्यात आला आहे.

या प्लॅटफॉर्मवर लोकांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी, कृती याद्वारे तुम्ही लोकांशी जोडले जाणार आहात. तसेच तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कनेक्ट होण्याची, मैत्री करण्याची खास सोय यामध्ये असणार आहे. सध्या गुगल शूलेस फक्त इन्व्हाईट ओन्ली बेसिसवर, अमेरिकेत उपलब्ध आहे. हे सोशल मीडिया ऍप ऍन्ड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्हीला सपोर्ट करेल.

या सोशल मीडिया ऍपमध्ये सामील होण्यासाठी, वापरकर्त्यांकडे गुगलचे खाते असणे आवश्यक आहे. जे लोक नव्या ठिकाणी अथवा नव्या शहरात आहेत किंवा ज्यांना आजूबाजूंच्या परिसराची काही माहिती नाही अशा लोकांसाठी हे ऍप खूपच फायद्याचे ठरणार आहे. गुगलने याआधी त्यांचे गुगल प्लस हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केला होता. त्यानंतर आता हा नवीन प्लॅटफॉर्म फेसबुक ला तगडी टक्कर देईल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.

Related posts: