|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » भारतात डेबिट कार्ड संख्येमध्ये 10 कोटींची घट

भारतात डेबिट कार्ड संख्येमध्ये 10 कोटींची घट 

मार्च-मे कालावधीतील माहिती : बँकांच्या नव्या कार्डमुळे परिणाम

त्तसंस्था/ चेन्नई

भारतात रोखरहित व्यवहारांचा वापर वाढत असला तरी डेबिट कार्डच्या संख्येत मात्र घट पाहायला मिळाली आहे. देशभरातील डेबिट कार्डची संख्येत मार्च ते मे या कालावधीमध्ये तब्बल 10 कोटींची घट झाली आहे. बँकांकडून नव्या प्रकारची  कार्ड वापरात आणल्यामुळे या कार्डांची संख्या कमी झाली आहे. तर याच कालावधीत पेडिट कार्डच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे.

बहुतांश बँकांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून डेबिट कार्डांचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सुरक्षात्मक डेबिट कार्ड ग्राहकांसाठी अनिवार्य केल्यानंतर अशी कार्ड एक जानेवारीपासून अस्तित्वात यावीत अशी अपेक्षा होती. त्यामुळे बदललेल्या नियमानुसार ग्राहकांना जुनी कार्ड बँकेत जमा करून नवी कार्ड घ्यावी लागली. या प्रक्रियेकडे असंख्य ग्राहकांनी पाठ फिरवल्याने डेबिट कार्डची संख्या सुमारे 10 टक्के म्हणजे 10 कोटींनी कमी झाली. देशात मार्चपूर्वी 92.4 कोटी डेबिट कार्ड वापरात होती. तर मे अखेरीस ही संख्या 82.4 कोटी इतकी झाली.

पीओएसला वाढती पसंती

पॉइंट ऑफ सेल मशिनवरील व्यवहारांसाठी मे महिन्यात पेडिट कार्डचा अधिक वापर झाला. पीओएसवर मेमध्ये भारतात 17.3 लाखांपर्यंत कार्ड स्वाइप झाली व त्यातून 61,300 कोटींचे व्यवहार करण्यात आले. तर मे महिन्यामध्ये एटीएमच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले.

Related posts: