|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » मंदीतून सावरत बाजारात किंचित सुधारणा

मंदीतून सावरत बाजारात किंचित सुधारणा 

सेन्सेक्स 0.04 टक्क्यांची वाढ : निफ्टी 35 अंकांनी वधारला

त्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार किंचित वधारत बंद होण्यात यशस्वी झाले. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (निफ्टी) सुमारे 35 अंक आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक (सेन्सेक्स) 0.04 टक्के वधारत बंद झाला. माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माता समभागाने बाजाराला सावरले. त्याचबरोबर वाहन समभागात चांगली खरेदी पाहायला मिळाली तर एफएमसीजी, बँकिंग आणि मालमत्ता समभागात विक्रीचा तणाव होता. बाजाराच्या शेवटी 30 समभागाचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 160.48 अंकांनी (0.41 टक्के) मजबुतीसह 38896.71 च्या स्तरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 35.85 अंकांनी (0.31 टक्के) वधारत 11588.35 च्या स्तरावर बंद झाला.

मिड आणि स्मॉल पॅप समभागात तणाव होता. बीएसईचा मिड पॅप निर्देशांक 0.61 टक्के घसरत 14465 च्या स्तरावर बंद झाला. तर स्मॉल पॅप निर्देशांकांत 0.63 टक्के घसरण पाहायला मिळाली. तेल-वायू समभागातही मरगळ होती. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.04 टक्क्यांनी थोडक्यात वाढीसह बंद झाला.

पीएसयू बँकांमध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळाली. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2.56 टक्के घसरणीसह बंद झाला. तर खासगी बँक निर्देशांकही 0.60 टक्के घसरत बंद झाला. बँकिंग समभागात वाढत्या तणावामुळे बँक निफ्टी 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 30446 च्या स्तरावर बंद झाला.

निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.27 टक्के, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक 2.85 टक्के आणि औषध निर्माता निर्देशांक 1.07 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.59 टक्के, मीडिया निर्देशांक 0.47 टक्के, धातू निर्देशांक 0.12 टक्के आणि मालमत्ता निर्देशांक 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.