|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल उद्या

कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल उद्या 

 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेले आणि फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) बुधवारी निकाल देणार आहे. या निकालाकडे सर्व भारतीय जनतेचे लक्ष लागले आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागावा अशी अशा भारताला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधत भारताने आयसीजेकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आयसीजेने मे 2017 मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आता कोर्ट बुधवारी याप्रकरणी निकाल देणार आहे.

 

Related posts: