|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » पाकिस्तानमधील कार उत्पादन थांबणार?

पाकिस्तानमधील कार उत्पादन थांबणार? 

पाक रुपयाचे अवमूल्यांकन-कराचा फटका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताप्रमाणेच आता पाकिस्तानमधील कार विक्रीत नरमाई आल्याचे पहावयास मिळाले आहे. पाकिस्तानचा रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होत गेल्याने वाहन क्षेत्राचे कंबरडे मोडल्याचे दिसून आले आहे. त्यातच पाक सरकारने अधिकचे कर लादण्यास सुरुवात केली. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलातच अशी स्थिती कार निर्मिती करणाऱया पाक कंपन्यांची झालेली आहे. तर सदरच्या कंपन्यांनी कारचे उत्पादन थांबविणार असल्याची घोषणा केली आहे. 

कार्स विक्रीविना पडूनच

गेल्या शुक्रवारीच कार्सची निर्मिती करण्याचे बंद करण्याचा निर्णय होंडा, अटलास कार (एचएसीपी) घेतला आहे. आतापर्यत दोन हजार कार्स विक्रीविना पडून आहेत. तर पाकिस्तानची टोयडा मॉडेल तयार करणारी इंडस मोटार कंपनीने मागील एका महिन्यात आठ दिवस उत्पादन बंदचा निर्णय घेतला आहे.

कार उत्पादन कपातीचा निर्णय

पाकिस्तानची सुझुकी मोटार कंपनीचे प्रतिनिधीने म्हटले की उत्पादनात कपात किती व कधी करायची यांचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कारण चालू महिन्यातील विक्री व बुकिंग आकडेवारीवरच अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले आहे.

Related posts: