|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » प्रदूषण पसरवणाऱया कंपन्या बंद : एनजीटी

प्रदूषण पसरवणाऱया कंपन्या बंद : एनजीटी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 वातावरणात अनेक मार्गांच्या अंतर्गत प्रदूषणात वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा औद्योगिक क्षेत्राचा आहे. त्यामधील कमीत कमी व जास्तित जास्त वातावरणात प्रदूषण करणाऱया कंपन्या येत्या तीन महिन्यात बंद करण्याचा आदेश देशातील नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी) दिले आहेत. देशात कार्यरत असणाऱया कंपन्यांचे मूल्यमापन करुनच हा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. आर्थिक विकास साध्य करताना आपल्याला जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. आणि ‘स्वच्छ व ग्रीन’  औद्योगिक क्षेत्राचा विकास करणाऱयावर भर देणार असल्याचे एनटीजीने म्हटले आहे.

दंड आकारणी शक्य

मागील पाच वर्षाच्या कालावधीत कोणत्या कंपनीने किती प्रमाणात वातावरणात प्रदूषण पसरवले आहे. त्यावर आधारित नुकसान भरपाईसोबत सदच्या कंपनीकडून दंडाची आकारणार असल्याची माहिती एनजीटीमधील न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांनी सीपीसीबीला आदेश दिले आहेत.

प्रदूषणधारक कंपन्या तीन वर्गात विभागणार

2009 -10 मध्ये सीपीसीबी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रिपणे अभ्यास करुनच देशातील औद्योगिक क्ल्स्टर्सच्या आधारे वेगवेगळय़ा विभागातील औद्योगिक संस्थाचे मूल्यमापन करुनच त्यातील कोणती कंपनी प्रदूषण करते. त्यावर त्यांचा वर्ग निश्चित करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.