|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गैरहजर मंत्र्यांबद्दल मोदी कठोर

गैरहजर मंत्र्यांबद्दल मोदी कठोर 

संसदेत अनुपस्थित राहणाऱया मंत्र्यांची यादी मागविली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 संसदेवर गैरहजर राहणाऱया स्वतःच्या मंत्रिमंडळातील सदस्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत नाराज असल्याचे मंगळवारी दिसून आले. मंत्र्यांच्या या वर्तनामुळे नाराज झालेल्या मोदींनी गैरहजर राहणाऱया मंत्र्यांची यादी तयार करण्याचा निर्देश पक्षनेत्यांना दिला आहे.

संसदेत मंगळवारी पार पडलेल्या भाजपच्या संसदीय बैठकीत मोदीनी पक्षनेते आणि विशेषकरून मंत्र्यांना कठोर संदेश दिला आहे. रोस्टरमध्ये नाव असूनही संसदेत अनुपस्थित राहणाऱया मंत्र्यांबद्दल अत्यंत नाराज असल्याचे समजते. हा मुद्दा गांभीर्याने घेत मोदींनी पक्षनेत्यांना संबंधितांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.

स्वतःच्या मतदारसंघासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करा, असे सांगत मोदींनी बैठकीत खासदारांना सामाजिक कार्यांशी जोडून घेण्याची सूचना केली आहे. 115 मागास जिल्ह्य़ांमध्ये खासदारांनी विशेष कार्य करण्याची गरज आहे. खासदारांनी गुरांशी संबंधित आजारांबद्दल मोहीम राबवावी, असे मोदीनी पशूपालनावर चर्चा करताना सांगितले आहे. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तास उपस्थित राहणे आवश्यक असते. पण अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षांचे सदस्य पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तक्रार करत असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

Related posts: