|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिशाभूल करत आहेत ट्रम्प : चीन

दिशाभूल करत आहेत ट्रम्प : चीन 

बीजिंग

चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने सरकत असल्याने त्याने अमेरिकेशी व्यापार करार करण्याची गरज असल्याची सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही सूचना दिशाभूल करणारी असल्याचा दावा चीनने केला आहे.

चीनचा दुसऱया तिमाहीतील विकासदर मागील 27 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. अमेरिकेच्या आयातशुल्कांचा चीनच्या कंपन्यांवर व्यापक प्रभाव पडतोय. हजारो कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. याच स्थितीमुळे चीन व्यापार करार इच्छित असल्याचे ट्रम्प यांनी सोमवारी ट्विट करत म्हटले होते.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि मंदी पाहता पहिल्या सहामाहीतील चीनचा आर्थिक वेग खराब नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेतील स्थैर्य जगासोबत अमेरिकेसाठीही चांगले ठरणार असल्याचे विधान चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केले आहे.

Related posts: