|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » संगणक पासवर्ड जनकाचे निधन

संगणक पासवर्ड जनकाचे निधन 

फर्नांडो कॉर्बेटो यांनी घेतला अखेरचा श्वास : टाईम शेअरिंग तंत्रज्ञान विकासात योगदान

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क 

अमेरिकेतील प्रख्यात संगणक संशोधक फर्नांडो कॉर्बेटो यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. कॉर्बेटो यांनी संगणक पासवर्डचा शोध लावला होता. 1960 च्या दशकात कॉम्प्युटर टाइम शेअरिंग सिस्टीमविषयक एका प्रकल्पावर त्यांनी काम केले होते. या प्रकल्पामुळे विविध ठिकाणांवर अनेक वापरकर्त्यांना एकाच संगणकाचा दूरध्वनी वायरच्या माध्यमातून एकाचवेळी ऍक्सेस करण्याची अनुमती देण्यात आली. त्यांच्या याच संशोधनामुळे आज आपण सर्वजण पर्सनल कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर पासवर्डचा वापर करत आहोत. फर्नांडो हे मॅसाच्युसेट्स इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक होते. 1950 च्या दशकात संगणकाचा वापर करणे थकवा आणणारे ठरायचे. त्या काळात संगणकाचा आकार मोठा असायचा आणि प्रोसेसिंग सिस्टीमवर एकावेळी केवळ एकच काम करणे शक्य होते. ही समस्या पाहता कॉर्बेटो यांनी टाईम-शेअरिंग तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानामुळे संगणकाच्या प्रोसेसिंग सिस्टीमला वेगवेगळय़ा कामांमध्ये विभागले गेले आणि यातूनच संगणकाकडून एकाचवेळी अनेक कामे करवून घेणे शक्य झाले होते.

कॉर्बेटो यांच्या संशोधनामुळेच एका संगणक यंत्रणेवर विविध लोक वेगवेगळी अकौट्सं उघडू शकतात. या प्रक्रियेत कुठलाही वापरकर्ता दुसऱया व्यक्तीचा विदा हाताळू शकत नाही. सीटीएसएस तंत्रज्ञानाने डिजिटल गोपनीयतेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Related posts: