|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईत विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानकावर प्रवाशांची गर्दी पहायला मिळते.

गर्दीच्या वेळेत अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो. दर आठवडय़ाला मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेच्या समस्या काही सुटत नाहीत. मागील दोन महिन्यांपासून रेल्वेची वाहतुक काही ना काही कारणांनी विस्कळीत होत आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरु असून, लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Related posts: