|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा : सु.कोर्ट

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा : सु.कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. विधानसभेत या बंडखोर आमदारांना हजर राहण्यासाठी सक्ती करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आहे.

कर्नाटकात निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्याचा सुप्रीम कोर्टाने प्रयत्न केला आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार आमदारांच्या राजीनाम्याप्रकरणी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतात, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासाठी कोणतीही कालमर्यादा नसेल. तसेच उद्या होणाऱया विश्वासदर्शक ठरावासाठी बंडखोर आमदारांवर उपस्थित राहण्याची सक्ती करता येणार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Related posts: