|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » बर्नाड अरनॉल्ट ठरले जगातील दुसरे श्रीमंत ग्रहस्थ

बर्नाड अरनॉल्ट ठरले जगातील दुसरे श्रीमंत ग्रहस्थ 

बर्नाड अरनॉल्ट ठरले जगातील दुसरे श्रीमंत ग्रहस्थ

वृत्तसंस्था/ पॅरिस (फ्रान्स)

जगातील अतिशय गरीब कोण आहे? यांची चर्चा जगभरात तितक्या ताकतीने होताना दिसत नाही. परंतु जगातील सर्वात श्रीमंत धनाढय़ कोण यांच्याकडे मात्र सर्वसामान्यापासून ते उच्च शिक्षितांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. असा निर्सगाचाच नियमच आहे. परंतु आता जगातील दुसऱया क्रमाकांचे धनाढय़ गृहस्थ म्हणून लग्जरी गुड्स कंपनी एलव्हीएमएच चे अध्यक्ष बर्नाड अरनॉल्ट (वय 70) यांची वर्णी लागली असल्याची माहिती ब्लूमबर्ग बिलेनिअरच्या निर्देशांकात नोंदवण्यात आली आहे.

एलव्हीएमएच चे समभागात 1.38 टक्क्यांनी तेजीत आल्यानेच अरनॉल्टचे नेटवर्थ मंगळवारी 108 अब्ज डॉलर्स (7.45 लाख कोटी) पोहोचली आहे. गेट्स यांची संपत्ती 107 अब्ज डॉलर्स (7.38 लाख कोटी रुपये) आहे. सात वर्षात प्रथमच बिल गेट्स तिसऱया नंबरवर आलेत.

अरनॉल्ट वर्षातील सर्वोच्च

पाचशे जणांच्या अब्जापतीच्या यादीत अरनॉल्ट यांचे नेटवर्थ चालू वर्षात सर्वाधिक म्हणजे 39 अब्ज डॉलर (2.69 लाख कोटी रुपये) चा फायदा झाला आहे. तर त्यांची नेटवर्थ ही फ्रान्सच्या जीडीपीच्या 3 टक्क्याच्या बरोबर असल्याची नोंदही यावेळी केली आहे. 

अरनॉल्ट यांच्या जवळ एलव्हीएमएच कंपनीचे जवळपास 50 टक्के समभाग आहेत. 1988 मध्ये त्यांनी कन्ट्रोलिंगमधील हिस्सेदारी खरेदी केली होती. त्याच्या जवळ फॅशन हाऊस क्रिश्चियन डायरचे 97 टक्के समभाग आहेत. आणि बेजॉस अरनॉल्ट हे समाज कार्यात जोडलेले आहेत. आगीत भस्म झालेल्या चर्चच्या उभारणीस अरनॉल्ट आणि त्यांच्या परिवाराने चालू एप्रिलमध्ये 65 कोटी डॉलर दिले आहेत.

जगातील पहिले पाच श्रीमंत

नाव         कंपनी देश          नेटवर्थ (रुपये)  नेटवर्थ (डॉलर)

जेफ बेजॉस………………….. ऍमेझॉन (यूएस)            8.62 लाख कोटी  125 अब्ज

बर्नाड ….. अरनॉल्ट एल (फ्रान्स)…………… 7.45 लाख कोटी  108अब्ज

बिल गेट्स ………………….. मायक्रोसॉफ्ट(यूएस)      7.38 लाख कोटी  107 अब्ज

वॉरेन बफे बर्कशायर हॅथवे(यूएस)………….. 5.79 लाख कोटी  83.9अब्ज

मार्क झुकेरबर्ग     फेसबुक(यूएस)     5.48 लाख कोटी  79.5 अब्ज

Related posts: