|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मंत्रिपदाचे आमिष दाखवून 3 आमदारांची फसवणूक

मंत्रिपदाचे आमिष दाखवून 3 आमदारांची फसवणूक 

 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

अरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना एका व्यक्तीने कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून संजय तिवारी असे त्याचे नाव आहे.

तिवारी याने स्वतः खासदार असल्याचे सांगून आमदारांकडून पैसे घेतले होते. आरोपी संजय तिवारीशी त्यांची ओळख गेल्या वषी दिल्लीतील एका कार्यक्रमात झाली होती. अरुणाचल प्रदेशला परतल्यानंतर आमदारांनी मंत्रिपदासाठी त्याला फोन केला. त्यावेळी फोनवर आरोपीने वरि÷ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यानंतर आमदारांनी आरोपीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले; मात्र त्यानंतर तो फरार झाला.

 

Related posts: