|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दहावीत यशस्वी होण्यासाठी ‘यशवंत व्हा’ उपयुक्त

दहावीत यशस्वी होण्यासाठी ‘यशवंत व्हा’ उपयुक्त 

उचगाव/ वार्ताहर :

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. दहावीतील यशावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरते. विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता तिच्याकडे सकारात्मकतेने कसे पहावे, यश मिळविण्यासाठी अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करू नये याबाबत दै. तरुण भारतची ‘यशवंत व्हा’ ही पुस्तिका मार्गदर्शन करते, असे मत मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. मरूचे यांनी व्यक्त केले.

येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये गुरुवारी  ‘यशवंत व्हा’ पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ पार पडला. यावेळी मरूचे बोलत होते.

या पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेत यशवंत होण्याचा मंत्र मिळणार आहे. त्याचबरोबर अभ्यासासाठी एक कुशल मार्गदर्शक उपलब्ध होणार आह, असे एन. ओ. चौगुले यांनी या पुस्तिकेसंदर्भात माहिती देताना सांगितले.

यावेळी एल. वाय. कावळे, व्ही. एम. देसाई, यळ्ळूरकर, एम. वाय. उचगावकर, प्रविणा देसाई, जी. के. तुप्पट, एस. एच. चौगुले उपस्थित होते.

एन. ओ. चौगुले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

गुणांच्या टक्केवारीत वाढ होईल

शाळेत आम्हाला शिक्षकाकडून सर्व विषयाचे धडे मिळतात. पण ‘यशवंत व्हा’ पुस्तिकेच्या माध्यमातून मला वेगवेगळय़ा शिक्षकांनी तयार केलेल्या प्रश्नोत्तराचा लाभ मिळणार आहे. वार्षिक परीक्षेत या पुस्तिकेमुळे माझ्या गुणांच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होण्यास मदत होईल,  असा विश्वास सलोनी पावशे या विद्यार्थिनीने प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

 

 

 

Related posts: