|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धर्म कार्यात सहभागी होणे खरी गुरूदक्षिणा ठरेल

धर्म कार्यात सहभागी होणे खरी गुरूदक्षिणा ठरेल 

बेळगाव / प्रतिनिधी :

धर्म संस्थापनेचे, म्हणजेच हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरूकार्य आहे. या कार्यात क्षमतेनुसार तन मन धनाने सहभागी होणे हीच काळानुसार खरी गुरू दक्षिणा ठरणार आहे. असे मार्गदर्शन हिंदू जनजागृती समितीचे भुजंग चव्हाण यांनी केले. हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने आयोजित गुरूपौर्णिमा महोत्सवात ‘हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते.

जयशंकर भवन येथे हा कार्यक्रम झाला. समितीच्या वतीने बेळगाव जिल्हय़ात 5 ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सव पार पडला. प्रारंभी श्री व्यास पुजन आणि सनातन संस्थेच्या गुरू परंपरेतील श्री मत्पपरमहंस चंद्रशेखरानंद, आनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज, प. पू. रामानंद महाराज, सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू संघटनांचे अद्वितीय कार्य आणि डॉ. जयंत आठवले यांचे अलौकीक कार्य या विषयावरील लघुपट दाखविण्यात आला.

महोत्सवात हमारा देश संघटनेचे वेंकटेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सुराज्य निर्मितीच्या ध्येयाने प्रेरित समाजाचे संघटन किंवा मानसीक प्रशिक्षण दिले तरच सुराज्य आणि हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य वाढेल असे सांगितले.