|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘यशवंत व्हा’ पुस्तिकेची जोड मिळाल्यास दहावीच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ

‘यशवंत व्हा’ पुस्तिकेची जोड मिळाल्यास दहावीच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ 

खानापूर / वार्ताहर :

दहावीचा अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा  असतो. या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे ज्ञान गुरुजनाकडून दिले जाते. पण या ज्ञानाला ‘यशवंत व्हा’ पुस्तिकेची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक  वाढ होवून त्यांना चांगले ज्ञानही मिळते. याकरिता विद्यार्थ्यानी दै. तरुण भारतातील यशवंत व्हा पुस्तिकेचा सदुपयोग करुन घ्यावा, असे आवाहन कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर कण्कुंबी विद्यालयात दै. तरुण भारत’ने आयोजित केलेल्या यशवंत व्हा पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

यावेळी ते म्हणाले, माऊली विद्यायालयात प्रारंभापासून यशवंत व्हा पुस्तिकेला विद्यार्थ्यानी अभ्यासक्रमात वापर केला आहे. समाजामध्ये तरूण भारतने शैक्षणिक वसा घेतला आहे. मुलांना काय तरी नवीन दिले पाहिजे, याकरिता तरूण भारतची धडपड आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पुस्तिकेचा अल्पदरात दर गुरुवारी शाळेपर्यत पोहचवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. अनेक वर्षापासून शाळेमध्ये शिक्षकाकडून कोणताही विषय विस्तृतपणे शिकविला जातो. पण तोच विषय यशवंत व्हा पुस्तिकेमध्ये थोडक्यात पण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशा शब्दात तज्ञ शिक्षकाकडून मांडला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तो कमी वेळेत अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकतो. साहजिकच याचा विद्यार्थ्याना परीक्षा काळात चांगला उपयोग होतो. यामुळे विद्यार्थ्यानी यशवंत व्हा पुस्तिका घेऊन त्याचे मनापासून वाचन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.