|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीज तार तुटून पडल्याने घबराट

वीज तार तुटून पडल्याने घबराट 

बेळगाव / प्रतिनिधी :

श्रीराम कॉलनी, आदर्शनगर येथे वीज तार तुटून पडल्याने एकच घबराट पसरली. मात्र, यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने अनर्थ टळला. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ रोखून धरण्यात आली होती. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन तुटलेली वीज तार पुन्हा पूर्ववत जोडली.

श्रीराम कॉलनी, आदर्शनगर येथे भूमिगत वीज तारा घालण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास हे काम एका बाजुस सुरू असताना दुसऱया बाजुची वीज तार अचानक तुटून पडली. वीज तार रस्त्यावर पडल्याने तेथील रहिवासी, दुकानदार आणि नागरिकांतून घबराट पसरली. या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. वीज तार तुटून पडल्याने काही वेळ वाहतूक रोखून धरावी लागली. घटनेची माहिती हेस्कॉमला कळविण्यात आली. वीजपुरवठा खंडित असताना वीज तर तुटून पडल्याने अनर्थ टळला आहे.    

 

 

 

 

Related posts: