|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देहदान ही काळाची गरज

देहदान ही काळाची गरज 

बेळगाव / प्रतिनिधी :

मरणोत्तर देहदान आणि अवयव दानाबद्दल समाजात जागृती करण्याचे काम डॉ. महांतेश रामण्णावर करीत आहेत. टिळकवाडी येथील सखी महिला मंडळातर्फे डॉ. रामण्णावर यांचे ‘देहदान तसेच अवयव दान’ संबंधी जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. बुधवारपेठ, टिळकवाडी येथील क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला.

 वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध तसेच विविध आधारांच्या कारणासंबंधी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी देहदान ही काळाची गरज आहे. शिवाय मरणोत्तर अवयव दान केल्याने एखाद्या रूग्णाला आपल्या मृत्यूनंतर नवजीवन देता येते. यासाठी मरणोत्तर देहदान, नेत्रदान तसेच त्वचादान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. रामण्णावर यांनी यावेळी केले. आज समाजात देहदानाविषयी बरीच जागृती झाली आहे. मरणोत्तर देहदाना करणाऱया नागरिकांची संख्याही वाढली आहे. मात्र अद्यापही समाजात देहदान विषयी जागृती होणे गरजेचे आहे. असे डॉ. रामण्णावर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात सखी महिला मंडळाच्या सदस्यांनी देहदानाबद्दल असणाऱया विविध शंका उपस्थित करून निरसन करून घेतले. प्रारंभी विणा नागमोती यांनी डॉ. महांतेश रामण्णावर यांचा परिचय करून दिला. यावेळी सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा तोरगल, सचिव स्मिता सरवीर, कोषाध्यक्षा उमा रूद्रगौडर, वसंती कोसंदल आणि सखी ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या. 

 

 

 

Related posts: