|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॅम्प विभाग माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा जाहीर

कॅम्प विभाग माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा जाहीर 

बेळगाव  :

बेळगाव शहर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने होणाऱया माध्यमिक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेबद्दल कॅम्पमधील बेननस्मिथ हायस्कूलच्या सभागृहात कॅम्प विभाग माध्यमिक आंतरशालेय क्रिडा शिक्षकांची बैठक मोठय़ा उत्साहात पार पडली.

यावेळी बेळगाव शहर क्रीडा अधिकारी एल. बी. नाईक यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेननस्मिथ हायस्कूलचे प्राचार्य व्ही. व्ही. केदनूर होते. यावेळी व्यासपिठावर कॅम्प विभाग क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, शिवानंद निडोणी, सचिव विनय मेळगी, ऍन्थोनी डिसोझा उपस्थित होते. बेननस्मिथ स्कुलचे क्रीडा शिक्षक व स्पर्धा संयोजक सेपेटरी प्रशांत देवदनम यानी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत पुढील तारखांप्रमाणे क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या.

स्पर्धेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

1 ऑगस्ट बुद्धीबळ स्पर्धा बेननस्मिथ स्कूल, 3 ऑगस्ट हॅण्डबॉल स्पर्धा मराठी विद्यानिकेतन स्कूल, योगा स्पर्धा सेंट मेरी सकूल, शटल बॅडमिंटन स्पर्धा बेळगाव जिल्हा बॅडमिंटन हॉल, 5 ऑगस्ट थ्रो बॉल स्पर्धा महिला विद्यालयत, 6 ऑगस्ट टेबल टेनिस स्पर्धा सेंट मेरीज स्कुल, कब्बडी स्पर्धा मराठी विद्यानिकेतन, 7 ऑगस्ट बास्केटबॉल स्पर्धा सेंटपॉल स्कूल, खोखो स्पर्धा मराठी विद्यानिकेतन स्कूल, नेट बॉल स्पर्धा सेंट पॉल स्कूल, 7 व 8 ऑगस्ट फुटबॉल स्पर्धा मराठी विद्यानिकेतन स्कूल, 9 व 10 ऑगस्ट क्रिकेट स्पर्धा सेंट मेरीज स्कूल, व्हॉलिबॉल स्पर्धा सेंट जोसेफ स्कूल, 10 ऑगस्ट हॉकि स्पर्धा एम. बी. सय्यद हॉकी मैदान, 22 व 23 ऑगस्ट ऍथलेटीक्स स्पर्धा जिल्हा क्रिडांगण.