|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

  आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनने मराठवाडा आणि विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाडय़ातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

   सध्या कोकण, गोवा आणि मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामानातील बदलामुळे दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी राहणार आहे. 19 जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाडय़ात पुन्हा पाऊस पडण्याची शक्मयता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱया चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. 21 आणि 22 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल. या काळात महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत मध्यम पावसाच्या सरिंची शक्मयता आहे. 22 जुलैपर्यंत मुंबईत पावसाचा जोर राहणार नाही. त्यानंतर मुंबई, डहाणू आणि ठाणे या किनारी भागात पावसाची तीव्रता वाढेल. 

Related posts: