|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » नाटय़गृहात एसी बंद; भरत जाधवचा संताप

नाटय़गृहात एसी बंद; भरत जाधवचा संताप 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाची बेफिकीरी आता चव्हाटय़ावर आली आहे. या नाटय़गृहात काल अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग होता. नाटय़गृहाचे संपूर्ण भाडे देऊनही तेथील एसी बंद ठेवण्यात आल्यामुळे कलाकारांना अक्षरशः घुसमट सहन करावी लागली. भरत जाधव यांनी घामाने भिजलेला व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाविषयी संताप व्यक्त केला आहे.

भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान काल या नाटय़गृहाचा एसी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कलाकारांची चांगलीच घुसमट झाली. ही बाब वारंवार नाट्यगृह कर्मचाऱयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, नाटक संपले तरी एसी सुरु करण्यात आला नाही. त्यामुळे संतापलेल्या भरत जाधवने घामाने भिजलेला व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. ‘याआधीही दोन वेळा मला असा अनुभव आला आहे. मात्र, कोणीही दखल घेत नसल्याने थेट नाटय़ रसिकांपुढेच येण्याचे ठरवले,’ असे भरत जाधव यांनी त्या व्हिडिओत म्हटले आहे.

Related posts: