|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » धर्मनिरपेक्ष, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज : बाळासाहेब थोरात

धर्मनिरपेक्ष, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज : बाळासाहेब थोरात 

ऑनलाईन टीम / शिर्डी : 

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहीजे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली, चर्चाही झाली. मात्र, ही गर्दी मतात परावर्तित का होवू शकली नाही. आघाडीसाठी मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरि÷ पातळीवर चर्चा होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

थोरात यांनी आज शिर्डीत साईंचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. थोरात म्हणाले, वंचित आघाडीमुळे काँग्रेसला नऊ जागांवर फटका बसला आहे. आता पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे. भाजपकडून लोकशाही, राज्यघटनेतील मुलभुत तत्त्वांना सुरूंग लावला जात आहे. या पार्श्वभुमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी, यासाठी साईबाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले.