|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » कुमारस्वामी सरकारचा आज फैसला होणार?

कुमारस्वामी सरकारचा आज फैसला होणार? 

ऑनलाईन टीम / बेंगळुरु :

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसचे आघाडी सरकार सत्तेत राहणार, की सत्तेवरून पायउतार होणार याचा निर्णय आज विधानसभेत होण्याची शक्मयता आहे.

15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याने कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकार पडू नये म्हणून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी सरकारला 19 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, कुमारस्वामी सरकारने विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा लांबवून प्रत्यक्ष मतदान घेणे टाळले आणि विधानसभेचे कामकाज आजपर्यंत स्थगित केले. विश्वासदर्शक ठराव निष्कर्षापर्यंत पोहोचेल, असे आश्वासन त्यांनी आघाडी सरकारकडून घेतले होते. तसेच, विश्वासदर्शक ठरावावरील प्रत्यक्ष मत अधिक काळ टाळता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे, सरकारने आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे टाळले, तर सर्वांच्या नजरा राज्यपाल पुढे काय पाऊल उचलतात याकडे असणार आहे.

कुमारस्वामी सरकारचा आज अखेरचा दिवस असेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी व्यक्त केला आहे.

Related posts: