|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » गटारे, शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह

गटारे, शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाले नाही : प्रज्ञा सिंह 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

      भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाने चर्चेत आल्या आहेत. मध्यप्रदेशातील सिहोर येथे एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेने निवडून दिले, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू,’ असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.

प्रज्ञा सिंह यांचा यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची प्रज्ञा सिंह यांनी एक प्रकारे खिल्ली उडवल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही प्रज्ञा सिंह यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वतःच्या कर्मानेच मृत्यू झाला, असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. तर दुसरीकडे दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यामुळे त्या वादाच्या भोवऱयात सापडल्या होत्या.