|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » भाजपकडून आमदारांना 2 कोटी, पेट्रोल पंपाचे आमिष : ममता

भाजपकडून आमदारांना 2 कोटी, पेट्रोल पंपाचे आमिष : ममता 

ऑनलाईन टीम / कोलकाता :

भाजपने 19 वी लोकसभा निवडणूक ईव्हीएम, सीआरपीए, निवडणूक आयोगाचा वापर करुन जिंकली आहे. आता विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याचे आमिष भाजपकडून दाखविले जात आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ममता बोलत होत्या. ममता म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावी. निवडणूक आयोगाकडे तशी मागणी करणार आहे. कर्नाटकप्रमाणे सर्व राज्यांमध्ये भाजपने आमदार फोडाफोडीचे सत्र सुरू ठेवले तर नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार पुढची दोन वर्षेही टिकणार नाही.

Related posts: