|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » रघुराम राजन होऊ शकतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक

रघुराम राजन होऊ शकतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक (आयएमएफ) होण्याची शक्मयता आहे. या पदाच्या शर्यतीत राजन यांचे नाव सर्वात पुढे आहे.

ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या पदासाठी भारतीय व्यक्तीच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार रघुराम राजन यांच्या नावाचा या पदासाठी विचार होत आहे. राजन यांच्याशिवाय बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, डेव्हिड कॅमरून सरकारमध्ये चॅन्सलर राहिलेले जॉर्ज ओसबॉर्न आणि नेदरलँडचे माजी वित्त मंत्री जेरॉइन डिजस्सेलब्लोएम यांच्या नावांचीही चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या क्रिस्टिन लेगार्ड यांनी मागील आठवडय़ात राजीनामा दिला आहे. तरीही ते 12 सप्टेंबरपर्यंत कारभार सांभाळणार आहेत.

रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे गव्हर्नर होते. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागाराचीही त्यांनी भूमिका बजावली होती. राजन हे सध्या ‘शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये शिकवितात.2003 ते 2006पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते प्रमुख अर्थतज्ञ आणि रिसर्च डायरेक्टर होते.

Related posts: