|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » एअर इंडियात पदोन्नतीसह नव्या भरतीला स्थगिती

एअर इंडियात पदोन्नतीसह नव्या भरतीला स्थगिती 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

निर्गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करणाऱया एअर इंडियाने अधिकाऱयांची पदभरती तसेच, विद्यमान अधिकाऱयांना पदोन्नती देण्याचे थांबवले असल्याचे कंपनीतील एका अधिकाऱयाकडून सांगण्यात आले आहे. एअर इंडियाचे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत 100 टक्के निर्गुंतवणुकीकरण करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी विमान कंपनी एअर इंडियात सध्या 10 हजार कायमस्वरुपी कर्मचारी कार्यरत आहेत. एअर इंडियावर किमान 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्र सरकारने गेल्या वषी या कंपनीतील 74 टक्के सरकारी भांडवल विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यास एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे सरकारकडून नव्या भरतीसह विद्यमान अधिकाऱयांना पदोन्नती देण्याचे स्थगित केले आहे, असे कंपनीतील अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे.

 

Related posts: