|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसानिमित्त एकाच बॅनरवरुन शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसानिमित्त एकाच बॅनरवरुन शुभेच्छा 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक स्वर्गीय आण्णासाहेब पाटील हे असून त्यांच्या काळापासून काँग्रेसेच्या झेंडय़ाखाली माथाडी संघटना होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेच्या झेंडय़ाखाली होती. या संघटनेतील पदधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संघटनेत राजकीय फूट पडली आणि नरेंद पाटील भाजपाच्या वाटेवर गेले. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर त्यांची वर्णी लागली आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे राजकीय गणित माथाडी संघटनेत सुरू झाले. यामुळे माथाडी कामगार संघटनेत दोन पक्षाचे नेते असल्याने आणि त्यांच्या नेत्यांचा एकाच दिवशी वाढदिवस आल्याने माथाडी कामगार संघटनेने दोन्ही नेत्यांचे फोटो लावून संघटनेच्या नेत्यांकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा दिल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची शुभेच्छांची बॅनरबाजीचा विषय चांगलाच चर्चाला आला आहे.

 

 

Related posts: