|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » कोहलीचे कसोटी अग्रस्थान कायम

कोहलीचे कसोटी अग्रस्थान कायम 

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी मानांकनात अग्रस्थान कायम राखलेआहे. 922 मानांकन गुणांसह तो पहिल्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळविला होता, त्यात कोहलीने भाग घेतला होता. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन 913 गुणांसह दुसऱया व भारताचा चेतेश्वर पुजारा 881 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. आयसीसीने सोमवारी नवी यादी जाहीर केली. सांघिक क्रमवारीत भारताने अग्रस्थान कायम राखले असून न्यूझीलंड दुसऱया व दक्षिण आफ्रिका तिसऱया, इंग्लंड चौथ्या व ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानवर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये भारताच्या दोन गोलंदाजांचा समावेश असून रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन अनुक्रमे सहाव्या व 10 व्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आयर्लंडविरुद्ध होणाऱया एकमेव कसोटीत खेळणार नाही.

उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीमुळे त्याला अनफिट ठरविण्यात आले आहे. बुधवारपासून ही कसोटी सुरू होत आहे. तो या कसोटीत खेळला असता तर अग्रस्थानावरील कमिन्सला मागे टाकू शकला असता. या दोघांत 16 गुणांचे अंतर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने अँडरसनला मागे टाकले होते आणि नंतर कमिन्सने त्याला मागे टाकत अग्रस्थान पटकावले होते. रबाडा सध्या तिसऱया स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या यादीत जडेजा तिसऱया स्थानावर आहे तर विंडीजचा जेसॉन होल्डर व बांगलादेशचा शकीब अल हसन अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत.

 

Related posts: